Posts

तीन दिवस…. तीन विषय....... तीन विभुती...... तीन अनुभव.....

Image
इतिहासाच एक वादळ जे ७८ व्या वर्षीही घोंगावतय. ज्या वादळाला कुणी एका बंधनात बांधुन ठेवु शकत नाही…. ते वादळ घोंगावत जात…… आता तुमचा मजबुत पाया ठरवतो की तुम्ही त्या वादळासमोर कसे टिकता. तुम्ही मातीशी पाय घट्ट रोवुन असलात म्हणजे तुम्ही या वादळासमोर तग धरु शकता. हे वादळ म्हणजे श्री आप्पा परब….. आप्पांनी बोलत जाव मुक्तपणे आणि आपण घेत जाव जितकी आपली पात्रता आहे. ७८ व्या वर्षी रायगड चढुन जाताना व्यक्त होणारे आप्पा परब खर तर दोन तासाच्या कार्यक्रमात व्यक्त होणं म्हणजे मृग नक्षत्रातल्या एकुण पावसातला एक थेंब जणु... डॉ. परीक्षित शेवडे आयुर्वेद चे खरे वैद्य अगदि सोप्या भाषेत सांगायच तर आयुर्वेदाचे डॅाक्टर... WHATSAPP वरच्या आयुर्वेद व इतिहास या विषयांवरच्या अंगठेबहाद्दरांचा खरपुस समाचार घेत दोन तास चांगलेच गाजवले. छत्रपति संभाजी महाराजांच्या युद्धनितीबद्दल अगदि हलक्या फुलक्या भाषेत डॅा. परिक्षीत शेवडे यांनी सांगितले. वय वर्ष २६ अस म्हटल्यावर सभागृहाने टाळ्या वाजविल्या त्या कौस्तुभ कस्तुरे यांनी गाजवला तिसरा दिवस. बाजिराव मस्तानी आणि अटकेपार झेंडा या पलिकडे पेशवे हे फारसे परिच

रायगड प्रदक्षिणा - २०१८ (वर्ष १७ वे)

Image
इतिहास अभ्यासता येतो पण भुगोल अनुभवावा लागतो….. या वाक्याची प्रचिती म्हणजे रायगड प्रदक्षिणा. गेली १६ वर्ष नियमितपणे रायगड प्रदक्षिणे चे नियोजन करणारे किरण शेलार यांच्या सोबत या वर्षी जायचा योग आला. जस परमेश्वराच्या चरणाशी आल्यावर त्याच्या उंचीची अनुभती येते तसच या रायगडाच्या पायथ्याशी केलेल्या प्रदक्षिणेनंतर रायगडाच्या उत्तुंगत्वाची अनुभूति येते. शिवरायांनी रायगड राजधानी म्हणुन निवडण्यापुर्वि रायगड परिसराचा अभ्यास केला तेच म्हणजे रायगड प्रदक्षिणा. रायगडाच्या हत्ती दरवाजाच्या खाली जाणा-या रस्त्याने पुढे जात रोप वेच्या इथे ही प्रदक्षिणा पूर्ण होते. गडाच्या सभोवतालचे संरक्षक किल्ले, व इतर परिसर पाहत जाताना शिवरायांनी पायथ्याच्या परिसरात वसवलेली वनराई हा महाराजांचा दुरदृष्टिपणा दाखवतो. यात पर्यावरणासोबतच रायगड चढाईसाठि प्रतिकुल बनविणे हा विचारसुद्धा असावा. नैसर्गिकदृष्ट्या अभेद्य असलेल्या रायगडाला परिपूर्ण राजधानीचे ठिकाण कसे बनविले असेल हे रायगड प्रदक्षिणेदरम्यान जाणवते. इतिहास आणि भूगोल किती सुरेख मिश्रण आहे ना.... इतिहास प्रत्यक्ष अनुभवता येत नाही पण भूगोल प्रत्यक्ष अनुभवल्

गरज

कुणी नेहमीपेक्षा चांगल वागतंय की समजायचं "तुमची गरज लागलीय" कुणी नेहमीपेक्षा वाईट वागतंय की समजायचं "त्यांची गरज भागलीय"  दुर्गवीर  चा  धीरु माझे अंतरंग https://mazeantrang.wordpress. com/ https://dhiruloke.blogspot.in/  
Image
होय आमचं या अंधाराशी जून “नातं” आहे. हे नातं आम्ही हौसेने नाही जोडलंय, ते परिस्थितीने लादलंय आमच्यावर….. आम्हीही आस लावून असतो कधीतरी आमच्या आयुष्यात प्रकाश येईल आणि आमची परिस्थिती उजळून निघेल….. #JoyOfHappiness माझे अंतरंग https://mazeantrang.wordpress.com/

उजेडाचे डोळे ओले

Image
जगात “नम्र” माणसांचे दोन प्रकार असतात एक जे मुळात “नम्र” नसतात पण सामाजिक परिस्थिती बघून “नम्रपणा” स्विकारतात आणि दुसरे जे मुळात,निसर्गतःच किंवा संस्काराने नम्र असतात. यातल्या दुसऱ्या प्रकारात मोडणारा एक व्यक्ती म्हणजे “ उमेश जाधव “.  दोस्त म्हणतो च्या निमित्ताने भेट झालेल्या उमेश बंधूंचा पहिला काव्यसंग्रह “उजेडाचे डोळे ओले” च्या प्रकाशनाच्या निमित्ताने आज जाणं झालं.  पोवाडा, लावणी,मुक्तछंद, भारूड सारखे दुर्मिळ प्रकार जे आजच्या आमच्या पिढीला क्वचितच माहित असतील अश्या विविध काव्यप्रकारातील तब्बल ४३ कवितांचा अनमोल खजिना उमेश दादांनी या पुस्तकात मांडलाय.  उमेश दादांच्या कवितांची समीक्षा वगैरे करण्याचं धाडस मी करूच शकत नाही तितकी पात्रता माझ्यात नाही.  एक व्यक्ती म्हणून मला उमेश दादांच कौतुक करावंस वाटत.  कारण तुम्ही कवी, लेखक, कलाकार म्हणून कितीही चांगले असलात तरी “माणूस” म्हणून कसे आहात हे महत्वाच असतं.  उमेश दादा कवी म्हणून जितके ग्रेट आहेत तितकेच माणूस म्हणून नम्र आहेत. दोस्त म्हणतो च्या त्रिकुटातील  विजय बेंद्रे  जर कवितेतून विद्रोह करत असेल आणि  मेघांत  प्रेम मांडत अस

सामानगड दुर्गसंवर्धन.....

Image
तुम्ही करीत असलेल्या कामाचं जेव्हा कौतुक होत तेव्हा बरं वाटत पण एखादं कार्य पूर्णत्वास नेण्यासाठी फक्त कौतुक पुरेस नसतं त्यासाठी हवा असतो सक्रिय सहभाग आणि सहकार्य ..... महाराष्ट्रभर दुर्गवीर प्रतिष्ठान तर्फे होत असलेल्या दुर्गसंवर्धनाच्या कार्यात असा सक्रिय सहभाग जेथे सर्वात उल्लेखनीय स्वरूपात लाभला तो कोल्हापूर (गाडींग्लज) परिसरातील सामानगड येथे. साधारण ५ वर्षांपूर्वी संतोष हसूरकर (अध्यक्ष :- दुर्गवीर प्रतिष्ठान) यांना या गडावरील वास्तू आणि इतिहास जपण्याची गरज आहे याची जाणीव झाली होती. याच जाणिवेतून सुरु झाला प्रवास सामानगड संवर्धनाचा..... संतोष हसूरकर यांनी स्थनिक तरुणांना एकत्र करून संवर्धनाला सुरुवात केली. कैलाश पारिट, दीपक जगदाळे या सारखे अनेक तरुण तयार केले. आज दर रविवारी १५ जणांची एक टीम इथे येऊन काम करते त्या प्रत्येकाचे नाव घेणं शक्य नाही पण प्रत्येक हाताने गेल्या ३-४ वर्षात घेतलेली मेहनत आज सामानगडाच्या कामात महत्वाचे ठरत आहे. ह्या संपूर्ण प्रवासात जसं स्थानिक कार्यकर्ते तयार होणं गरजेचं होत तसच शासकीय अधिकाऱ्यांच सहकार्य अत्यंत आवश्यक होत. वन विभागाचे अधिकारी क

Joy Of Happiness

Image
#JoyOfHappiness माझ्या एका परिचयाच्या व्यक्ती ने मला विचारल “तुम्ही लातुर ला जे सोलार दिवे, भांड्यांचे किट, वाचनालय, शाळेची इमारत देणार, या एवढ्या मोठ्या उपक्रमात माझ्या २००-५०० रुपयाने काय फरक पडणार ?? पण निट विचार केला तर फरक पडतो एक सोलार दिवा रु.७००/-, एक भांड्यांच किट रु.२५०/-, एक वाचनालय रु.५०००/-(अंदाजे). यातुन स्वेच्छेने किती सोलार लॅंप किंवा भांड्यांच्या सेट ची किंमत तुम्ही देवु शकता हे तुम्ही ठरवा. तुमच्या छोट्यातली छोटी मदत एखाद्या गरिबाच्या घरात प्रकाश देवु शकतो. तुमच्या सहकार्यानेच उभ्या राहणा-या शाळा आणि वाचनालयातुन एक सुशिक्षीत पिढि घडणार आहे. फरक पडतो फक्त तुमचा मदतीचा एक हात सर्व परिस्थिति सुधारु शकतो. लोकसहभागात एक ताकद असते जी एक पिढि घडवु शकते. तुम्ही सहकार्य तर कराच शिवाय तुमच्या परिचयाच्या व्यक्तिंना नक्की आवाहन करा. संपर्क:- टीम : दुर्गवीर प्रतिष्ठान संतोष हसुरकर 9833458151 अजित राणे 8097519700 नितीन पाटोळे 8655823748 टीम MSA नितेश जाधव 9967070987 / प्रशांत टक्कर 9967500889 / नंदू चव्हाण 9892042704 मदत रोख स्वरुपात द्या किंवा चेक स्वरुपात किंवा बॅंक ट्रान्सफ