Posts

Showing posts from 2014

हिंदुस्थानच्या इतिहासातील राजे :- कलिंग (ओरिसा ) चा "सम्राट खारवेल"

Image
हिंदुस्थानच्या इतिहासातील राजे :- कलिंग (ओरिसा ) चा "सम्राट खारवेल" सम्राट अशोकाच्या मृत्युनंतर दहा एक वर्षात अशोक वंशीयांचे आधिपत्य नाकारुन स्वताचे राज्य स्थापणा-या दाक्षिणात्य राज्यातील आंध्र व ओरिसा(कलिंग) राज्यांपैकि कलिंग चा राजा म्हणजे सम्राट खारवेल. डेमेट्रियस (ग्रिक)सैन्याचा संपूर्ण हिंदुस्थानात कोणीहि प्रतिकार करत नसताना राजा खारवेलने शस्त्रसज्ज सैन्यासह अयोध्ये च्या आसपास च्या परिसरात आक्रमण करुन हिंदुस्थानच्या पर्वत सिमेपार पाठविले. कलिंगात या विजयाप्रित्यर्थ राजसुय यज्ञाचे आयोजन करण्यात आले ४०-५०वर्षातला तो सर्वात मोठा यज्ञ समजला जातो. संपूर्ण हिंदुस्थानात निशस्त्रीकरणाचे वारे वाहत असताना क्षात्रतेज जागविणारा राजा म्हणुन खारवेल चा उल्लेख करायला हवा. खारवेल चे डेमेट्रियस ग्रिकांवरील आक्रमण ही क्रांति होती ज्याच्या बळावर पुढे मिन्यांडर ग्रिकांवर आक्रमण करुन त्यांना हिंदुस्थानबाहेर हाकलुन लावण्यासाठि व हिंदुस्थानातुन ग्रिकांचे नामोनिशान मिटवुन टाकण्यास उपयुक्त ठरली. माहिती स्त्रोत :- सहा सोनेरी पाने - स्वातंत्रवीर सावरकर छायचित्र स्त्रोत :- Internet दुर

खरी लढाई

Image
दुस-याला "बाजूला करण्यासाठी" "लढण्यापेक्षा", "दुस-याच्या बाजूने" "लढून" पहा…. दुर्गवीर  चा  धीरु माझे अंतरंग http://dhiruloke.blogspot.in/

हिंदुस्थानातच्या इतिहासातील राजे :- सम्राट बिंदुसार

Image
हिंदुस्थानातच्या इतिहासातील राजे :- सम्राट बिंदुसार "सम्राट चंद्रगुप्त" व "ग्रीक राजा सेल्युकस" ची राजकन्या यांचा विवाह झाला व त्यांचाच पुत्र "बिंदुसार". ई.स.पू. २९८ ला "चंद्रगुप्त" मरण पावला व "बिंदुसार" त्या गादीवर बसला. "बिंदूसार" हा पित्याप्रमाणे महाराक्रमी होता. त्याने "चंद्र्गुप्ताचे" अखंड हिंदुस्थान चे स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीने घोडदौड सुरु केली होती. उत्तर हिंदुस्थानात आपले एकछत्री अंमल प्रस्थापित केल्यावर त्याने दक्षिण स्वारी केली आणि तिथेही आपले राज्य प्रस्थापित केले. त्याच्या पराक्रमाने त्याचे शत्रू त्याच्या विरोधात उभे राहत नव्हते. त्याच्या याच पराक्रमाने त्याला "अमित्रघात" म्हणजेच "शत्रूंचा कर्दनकाळ" हि पदवी मिळाली होती. त्याने उत्तर - दक्षिण - पूर्व - पश्चिम अश्या संपूर्ण हिंदुस्थानात आपले एकछत्री अंमल प्रस्थापित केले होते. पूर्व नि पश्चिम समुद्राच्या मध्यांतरीच्या तब्बल १७ राजधान्या "मौर्य साम्राज्यात" सामील करून घेतल्या असा उल्लेख ग्रंथातून आढळतो. "सम्राट

संवत् / संवस्तर / शक म्हणजे काय?

Image
संवत् / संवस्तर / शक म्हणजे काय? आपण आपले मराठी कॅलेंडर निट पाहिले तर "शालीवाहन शके 1936" किंवा "विक्रम संवत् 2071" वगैरे दिसेल हे नक्की काय असते आणि याची उत्पत्ती कुठून झाली हे आपणांस कदाचीत माहीत नसेल. यावर्षीच - 2014च कॅलेंडर निट पाहिले तर लक्षात येते की, "गुढिपाडवा" "31 मार्च 2014" रोजी "शालीवाहन शके 1936 प्रारंभ" असे आहे. "दिपावाली पाडवा" "24 ऑक्टोबर 2014" रोजी "विक्रम संवत् 2071 प्रारंभ" असे आहे. म्हणजे "शालिवाहन शक" "येशु ख्रिस्त" च्या नंतर सुरू झाले व "विक्रम संवत्" हे "येशु ख्रिस्ताच्या" अगोदर सुरू झाले. संवत् / सवस्तर / शक म्हणजे एखाद्या राजाने त्याने केलेल्या पराक्रमाची आठवण म्हणून त्या दिवासापासुन नविन वर्ष सुरू करणे. प्रथम "शक" हा शब्द "संवत् / संवस्तर" यासाठी पर्यायी "परकिय शब्द" आहे. इतिहासात उपलब्ध नोंदिनुसार आजवर टिकलेले काहि संवत् उपलब्ध आहेत :- 1. कृत किंवा मालव 2. विक्रम 3. शालिवाहन > ई.स. पूर्व 5

एक अतूट नाते :- शिवप्रेमींचे

Image
तुम्ही एखादे चांगले कार्य करता तेव्हा तुमच्या सोबत येणारी माणसे हि चांगलीच असतात, त्यांचा तुमच्यासोबत येण्याचा उद्देशहि स्वच्छ असतो. याचाच प्रत्यय आज "दुर्गवीर" च्या शस्त्र प्रदर्शन व गडसंवर्धन छायचित्र प्रदर्शनात आला. "दुर्गवीर" च्या कार्याने प्रभावित होऊन पंजाब बॉर्डर वरून शिर्डी आणि शिर्डी वरून मुंबई असा प्रवास करून आलेल्या "सोमनाथ ढवळे" यांची भेट घेताना जाणीव झाली आम्ही काय कमावलाय. फेसबुक वरून माझे दुर्गवीर श्रमदानाचे फोटो पाहून दुर्गवीर बद्दल त्यांना आदर निर्माण झाला आणि त्यांच्या १० दिवसाच्या सुट्टीचा पहिला दिवस दुर्गवीरांसोबत घालविण्यासाठी "सोमनाथ ढवळे" मुंबईत हजर झाले. मुंबईतील काहीही माहिती नाही. दादर ला उतरल्यावर त्यांनी चौकशी केली तर त्यांना कोणी सांगितले काळाचौकी ३ ठिकाणी आहे परंतु शिवकृपेने एका व्यक्तीने त्यांना Taxi करून प्रदर्शनाच्या जागी आणून सोडले. ह्या घटनेतून एक मात्र नक्की माझी आणि त्यांची ओळख,व "त्या "अनोळखी व्यक्तीने" त्यांना मुंबईत मदत करण, आणि दुर्गवीरांची भेट हे सर्व विधिलिखित होत. या सर्व भेटी शिव

"शिवराय" म्हणजेच "गडकिल्ले" आणि "गडकिल्ले" म्हणजेच "स्वराज्य" !!!

Image
काय। करतोय "हा" "दादा" !! असाच प्रश्न या मुलाला पडला !! वेळ होती दुर्गवीर च्या गडसंवर्धन छायचित्र प्रदर्शनाची..... या मुलाला "गडसंवर्धन" हा शब्द सुद्धा निट बोलता येत नव्हता त्याला जेव्हा विचारलं हे शिवाजी महाराज कोण होते? आणि हे गड-किल्ले म्हणजे काय रे!! तेव्हा त्याचे उत्तर मोठमोठ्यांना अव्वाक करुन जाते!! "शिवाजी महाराज हे मोठे राजे होते आणि त्यांनी तलवारीने मोठमोठ्या लढाया केल्या!! आणि या किल्ल्यांवर ते राहिले"..... शिवरायांनी स्वतासाठि राजवाडे नाहि बांधले तर आयुष्यभर या गड-किल्ल्यांच्या साथीने    ते    लढले... जे या निरागस मुलाला समजलं ते आपल्यालाहि समजायला हवं... शिवराय म्हणजेच गडकिल्ले आणि गडकिल्ले म्हणजेच आपले स्वराज्य !!! जय शिवराय छायचित्र सौजन्य "दुर्गवीर सचिन रेडेकर" www.durgveer.com दुर्गवीर  चा  धीरु माझे अंतरंग http://dhiruloke.blogspot.in/

"अलेक्झांडर" आणि "चंद्रगुप्त"

Image
"अलेक्झांडर" आणि "चंद्रगुप्त" "अलेक्झांडर" हा ग्रिकांचा महान राजा ज्याला त्याच्या पित्याकडुन (राजा फिलिप) 'प्रचंड पैसा व सैन्य बळ' मिळाले त्याच्या बळावर तो ग्रिक मधील सर्व छोट्या मोठ्या गणराज्यांना गिळंकृत करत आला. परंतु "हिन्दुस्तानी" जनतेने त्याच "स्वामित्व" कधीच मानले नाहि उलट तो जो प्रदेश जिंकुन पुढे जायचा तिथली जनता त्याची पाठ फिरताच दंड ठोकुन उभे राहायचे जेव्हा त्याला जाणवलं आपला येथे निभाव लागण अशक्य आहे तेव्हा त्याने परतायचा निर्णय घेतला परंतु जाता जाता त्याची महत्वाकांक्षा त्याला स्वस्थ बसु देत नव्हती व तो सैन्याच्या मनाविरुध्द लढाया लढत होता...परंतु पाश्चात्य लेखक अलेक्झांडर च वर्णन करताना त्याला "जिंकायला प्रदेश न उरल्याने हताश होऊन परत गेला" असं करतात हे खुपच अतिशयोक्तिपूर्ण आहे. दुस-या बाजुला "चंद्रगुप्त राजा" जो अलेक्झांडर च्या स्वारि अगोदरपासुन "अखंड हिंदुस्थान" चे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठि धडपडत होता त्याचा इतिहास जाणुनबुजून दडपला जातो. जेव्हा "चंद्रगुप्त" "अखंड ह

"जगण्यासाठी झटण्यापेक्षा… झटण्यासाठी जगून पहा"

Image
कित्येक लोक आम्हा "दुर्गवीरांना" विचारतात हे एवढ हात-पाय तोडून, एवढी किल्ल्यांवर कामं करता… काय मिळत तुम्हाला हे सर्व करून….… या प्रश्नाच उत्तर एकच आहे, "आम्हाला तेच मिळत जे बाजीप्रभूंना घोडखिंडीत प्राण देऊन मिळाले" "आम्हाला तेच मिळत जे कोंढाणा जिंकताना हौतात्म्य पत्करणा-या तानाजी मालुसरेंना मिळाले" "आम्हाला तेच मिळत महाराजांच्या एक शब्दावर शरीराची चाळण होइपर्यत लढणा-या प्रतापराव(कुड्तोजी) गुजर यांना मिळाल… आज आम्हाला शंभरी पार करणारे आमचे पूर्वज कदाचित आठवणार नाहीत पण ऐन पन्नाशीत देवाज्ञा घेणारे शिवराय आणि ऐन तिशीत बलिदान देणारे शंभूराजे आपण विसरणे अशक्य आहे. म्हणून जन्माला येउन किड्या मुंग्याच आयुष्य जगणं आम्हाला मान्य नाही म्हणूनच आम्ही दुर्गवीर या कार्यसाठी झटतोय…… तुम्हीसुद्धा "जगण्यासाठी झटण्यापेक्षा… झटण्यासाठी जगून पहा" जय शिवराय www.durgveer.com दुर्गवीर  चा  धीरु माझे अंतरंग http://dhiruloke.blogspot.in/

झोकात पुनरागमन:- ३०/११/२०१४ :- सुरगड श्रमदान मोहीम

Image
"झोकात पुनरागमन" अगदी असच वर्णन करायच दुर्गवीर च्या आजच्या "सुरगड श्रमदान मोहीम ३०/११/२०१४" च्या मोहिमेचे. "महिन्यातील १ रविवार १ श्रमदान" पण अगदी झोकात… प्रदीप पाटलांचे झोकात पुनरागमन, नवीन दुर्गवीरांचे झोकात आगमन, प्रज्वल पाटील आणि पनवेलच्या दुर्गवीरांचे दणकट आगमन, तुषार चित्ते आणि अनिकेत कस्तुरे यांचे झोकात आगमन या आणि अनेक गोष्टीनी परिपूर्ण अशी आजची दुर्गवीर ची मोहीम…तबल २५-३० दगडी पाय-या बांधून काढल्या त्याही त्यावर "Disco Dance" केला तरी तुटणार नाहीत अश्या. प्रदीप पाटील बंधूच्या बांधकाम क्षेत्रातील अनुभवाचा पुरेपूर वापर करून पाय-या अक्षरशा बांधून काढल्या फक्त सिमेंट वापरल नाही इतकच…. अगोदरच मी लेट झालो त्यामुळे मला दिवा- रोहा ट्रेन चुकली तरीही प्रज्वल बंधू आणि त्यांच्या पनवेल मित्रमंडळ परिवाराने "मोठ्या मनाने" "माझ छोटस" शरीर Adjust करून घेतलं(कोंबून म्हटलं तरी चालेल…. ) कंपनी जी गाडी ४ माणसांसाठी बनवली त्यात आम्ही ७ जण Adjust झालो होतो. रात्री मी डबा घेऊन येणार म्हणून अर्धपोटी आणि क्वचित उपाशी झोपी गेलेल्या दुर्गवी

विवेकानंद व्याख्यानमाला २८/११/१४ :- Timeless Management :- श्री निनाद बेडेकर

Image
विवेकानंद व्याख्यानमाला २८/११/१४ आजचा विषय "Timeless Management" वक्ते होते श्री निनाद बेडेकर... खर तर हा विषय इतका अफाट आहे की १-२ तासात हा विषय समजावुन सांगता येणार नाही. या व्याख्यानमालेतील दुग्ध-शर्करा योग म्हणजे शिवरायांच्या Management ची तत्वे आणि त्यात श्री निनाद बेडेकर यांच वक्तृत्व. ३५० वर्षापूर्वी शिवरायांनी राज्यकारभार करताना जी तत्व वापरली तीच तत्व आता आचरणात आणता येतील आणि अजून ३५० वर्षानंतरहि हिच तत्वे आचरणात आणता येतील फक्त त्याची माध्यमे बदलतील. अफजल खान वध, शाहिस्तेखान स्वारी,पन्हाळ्याहुन सुटका,आग्र्याहुन सुटका,पुरंदरचा तह, या आणि अनेक घटना, किंबहुना शिवरायांचे संपूर्ण आयुष्यच Management च्या विविध तत्वांप्रमाणे संपूर्ण जगाला आज आणि यापुढिल हजारों लाखो वर्षे मार्गदर्शन करीत राहिल. विवेकानंद व्याख्यानमालेचे यशस्वी आयोजन व नियोजन करणारया विद्यार्थी उत्कर्ष मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन व आभार जय शिवराय दुर्गवीर  चा  धीरु माझे अंतरंग http://dhiruloke.blogspot.in/

विवेकानंद व्याख्यानमाला - २०१४

Image
माझ थोडसं Timing चुकल म्हणून मी श्री नथुराम गोडसे आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांची भेट घेउ शकलो नाही याची सल कायम मनात राहील पण त्यांचे विचार जगणा-या श्री. शरद पोंक्षे यांना आज जवळून पाहण्याची आणि ऐकण्याची संधी मिळाली हे सुख मला आयुष्यभर पुरेस आहे… विद्यार्थी उत्कर्ष मंडळ तर्फे आज सावरकरांचे विचार या विषयावर श्री शरद पोंक्षे यांचे व्याख्यान ऐकले. आज ख-या अर्थाने समजलं सावरकर हे लोकांना "समजायला" "काही वर्ष" जातात आणि जेव्हा ते "समजतात" तेव्हा "ज्याला ते समजतात" ते "चांगलेच समजून जातात" कि आपल्या देशाची "गुलाबाने" काय आणि कशी वाट लावली (हे "गुलाब" म्हणजे काय हे शरद पोंक्षेच आजच व्याख्यान ऐकना-यांना चांगलच माहित आहे) आजवर मी शरद पोंक्षे ना अभिनेता म्हणून ओळखत होतो पण कणखर, ज्वलंत, परखड वक्ता हि नवीन ओळख मी आज अनुभवली. खर तर मी सावरकर आणि नथुराम गोडसे यांची पुस्तके घेऊन गेलेलो ज्यावर मला "वक्ते शरद पोंक्षे" यांची स्वाक्षरी हवी होती.पण त्यांच्या व्यस्त कार्यक्रमामुळे ते शक्य झाल नाही … बघू पुन्हा कधी

शिवमय दिवाळी पहाट - २००१४

Image
शिवमय दिवाळी पहाट - २००१४ कोण म्हणत ४ चांगली माणस एकत्र येत नाहीत… त्याला जाउन सांगा कोणीतरी !! ४ चांगली माणस एकत्र येतात जर त्यांच धेय्य आणि हेतू स्वच्छ असेल तर ते निस्वार्थीपणे एकत्र येतात. काल रात्री १० ते १०:३० च्या दरम्यान अजित दादांचा फोन आला उद्या सकाळी बाजीप्रभू चौक डोंबिवली (पूर्व) येथे आपल्या जायचंय. तिथे आपल्या छोटासा "दीपोत्सव" साजरा करायचा आहे. पण इतक्या उशिरा पोस्ट टाकली तर कोण येईल का?? मुख्य म्हणजे कोणी ती पोस्ट वाचेल का? हा प्रश्न उभा राहिला पण नंतर त्या प्रश्नाच उत्तर शोधण्याच्या फंदात न पडता पहिली फेसबुक ला पोस्ट टाकली नंतर मिळेल ते सामान bag मध्ये भरून घेतले. आता मुख्य मुद्दा होता सकाळी ४ वाजता उठायचा. मी एकदा झोपलो को "कुंभकर्ण" पण "फिका" पडेल माझ्या समोर म्हणून फारशी रिस्क न घेता रात्रभर जाग राहायचं ठरवलं. सकाळी अजित दादांशी फोना-फोनी करून निघालो थेट भेट झाली ती बाजी प्रभू चौकात तिथे अजित दादांनी अगोदरच कामाला सुरुवात केली होती. मी हि त्यांच्या सोबत सुरुवात केली तोवर हळू हळू एक एकजण जमा होऊ लागले जो तो मिळेल ते काम करत होता.

दिपावलीच्या तेजोमय शुभेच्छा !!

Image
राजमुद्रेसम झळकू दे, भविष्य तुमचे !! दिव्यांसम उजळू दे, आयुष्य तुमचे !! दिपावलीच्या तेजोमय शुभेच्छा !!! दुर्गवीर  चा  धीरु माझे अंतरंग http://dhiruloke.blogspot.in/

Control & Smile

Image
काय गंम्मत आहे ना !!! जेव्हा माझा राग "Control" मध्ये असतो…. तेव्हा माझ्या "विरोधकांचा" राग "Out of Control" असतो… दुर्गवीर  चा  धीरु माझे अंतरंग http://dhiruloke.blogspot.in/

जन्मदिनाच्या शिवमय शुभेच्छा….

Image
अजित दादा आपलं रक्ताच अस नात काहीच नाही पण गतजन्मीच नात नक्कीच असणार…. ह्या अभेद्य अफाट सह्याद्रीच्या काताळांशी भिडत त्यांच्याशी अतूट नात निर्माण करायला लावणा-या या आमच्या अजित दादांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा…. समोरच्याला त्याच्याच भाषेत उत्तर कसं द्याव हे अजित दादांकडून शिकावं…. कट्टरता म्हणजे काय ते अजित दादांकडून शिकावं…. (मग ती हिंदुत्व आणि शिवसेनेबाबत असो कि दुर्गवीर च्या गड्संवर्धनाबाबत…. ) मी "धीरज विजय लोके" वरून "दुर्गवीर चा धीरु" असा नामांतरित (कार्यांतरित) झालो त्यात सर्वात महत्वाचा वाटा दादा तुमचा आहे… दादा आपण दुर्गवीर म्हणून एकत्र आलो हा काही योगायोग नाही ती "नियती" होती…. पण आपण कायम "दुर्गवीर" म्हणून एकत्र राहू हा माझा "शब्द" आहे…. पुन्हा एकदा जन्मदिनाच्या शिवमय शुभेच्छा…. जय शिवराय !! जय हिंद !!   दुर्गवीर  चा  धीरु माझे अंतरंग http://dhiruloke.blogspot.in/

सलाम स्त्री शक्तीला…

सलाम स्त्री शक्तीला… "स्त्री" नवरात्रीत "देवी" म्हणून पूजले जाते पण दुस-या बाजूला "काही ठिकाणी" स्त्रीला दुय्यम वागणूक दिली जाते. मी एक स्त्री आहे म्हणून मी "हे करू शकत नाही" हे सांगायचे दिवस गेलेत आता…. आजच्या काळात स्त्री पुरुषाच्या बरोबरीने काम करू शकते इतकी ती स्वावलंबी आहे. काही ठिकाणी अजूनही जुन्या विचारांची धारणा असल्याने स्त्री ला कमी लेखले जाते. त्याच्यावर प्रहार करणारा हा Video नक्की पहा. आणि शेअर करा… सलाम स्त्री शक्तीला Video Right Reserve @ Official: Chulein Aasman - Salim-Sulaiman & Farhan Akhtar. MARD - HWGO Initiative. 2014 दुर्गवीर  चा  धीरु माझे अंतरंग http://dhiruloke.blogspot.in/

विजय....

Image
माझा स्पर्धक "हरला पाहिजे" यापेक्षा मी "जिंकलो पाहिजे" हा विचार केला तर "विजय" तुमचाच आहे… दुर्गवीर  चा  धीरु माझे अंतरंग http://dhiruloke.blogspot.in/     

मी एक "सामान्य नागरिक"

Image
मी कोणी कट्टर शिवसैनिक नाही कि "मोदी समर्थक" नाही आहे. तुम्ही "युती करा अगर करू नका"… "निवडणुकीपूर्वी एकत्र या किंवा निवडणुकीनंतर" पण एकच करा या "भ्रष्ट काँग्रेस - राष्ट्रवादीला" पुन्हा महाराष्ट्राची सत्ता देऊन नका… जय शिवराय…. मी एक "सामान्य नागरिक"    दुर्गवीर  चा  धीरु माझे अंतरंग http://dhiruloke.blogspot.in/

"विश्वास" = "प्रेम"

Image
कुणाच्या "चांगल्यासाठी"  "खोट " बोललेलं चालतं…… पण, हा "नियम" "प्रेमात" लागू होत नसतो… कारण, प्रेमात "चांगल" "वाईट" अस काही नसतं…. असतो तो फक्त "विश्वास" दुर्गवीर  चा  धीरु माझे अंतरंग http://dhiruloke.blogspot.in/

Facebook Attitude...

Image
आयुष्यात एवढे "मोठे" व्हा की, ज्यांनी तुमची "Friend Request" नाकारली, ते स्वत:हुन तुम्हाला "Friend Request" पाठवतील… दुर्गवीर  चा  धीरु माझे अंतरंग http://dhiruloke.blogspot.in/

जय जवान…

Image
जय जवान…  भारतीय जवान!! आपल्या हिंदुस्थानची शान…. युद्धभूमीवर प्रत्येक शत्रूशी प्राणपणाने लढणारे आपले जवान. आज काश्मीर मधील पूर परिस्थितीत पुरग्रस्थाना वाचविण्यासाठी जात, धर्म याच्या पलीकडे जाउन जे  मदतकार्य सुरु आहे ते विलक्षण आहे. ज्या काश्मिरी जनतेने नेहमी आपल्या जवानांची अवहेलना केली  त्यांच्याच मदतीला हे जवान आपल्या प्राणांची बाजी लावत आहेत. एका बाजूला आपले जवान हे मदत कार्य  करीत असताना दुसरीकडे "अतिरेकी" कारवाया चालूच आहेत. श्रीनगर येथे तब्बल ४ अतिरेक्यांना भारतीय  जवानांनी कंठस्थान घातले http://news.oneindia.in/india/kashmir-three-heavily-armed-terrorists-gunned-down-army-1518616.html http://zeenews.india.com/news/jammu-and-kashmir/let-commander-among-four-terrorists-killed-in-north-kashmir_1467922.html या दोन्ही गोष्टींचा नीट विचार केला तर असे आढळते कि आपली "सहिष्णुता" हि "षंढपणा" समजून "आपले  शत्रू" (मानवतेचे शत्रू) आपल्याला नेहमी लक्ष्य करतात. पण आपले जवान नेहमीच याचा बिमोड करतात. आजवर प्रत्येक संकटाला धीरा

सुसंवाद

Image
तुम्ही कसं वागावं, हे जसं तुम्ही ठरविता.  तसच दुस-यांनी कसं वागाव हे त्यांना ठरवू द्या…. सुसंवाद नक्की होईल दुर्गवीर   धीरु माझे अंतरंग http://dhiruloke.blogspot.in/

ताकद....

Image
तुमच्यात इतकी ताकद असू द्या कि, जे आजवर हात धुवून तुमच्या मागे लागले होते ते यापुढे तुमच्या मागे पुढे फिरतील… दुर्गवीर   धीरु माझे अंतरंग http://dhiruloke.blogspot.in/

जस्ट हलकं फुलकं - एक सणसणीत चपराक…

Image
जस्ट हलकं फुलकं - एक सणसणीत चपराक… आज दादर च्या शिवाजी नाट्य मंदिरात नितीन पाटोळे, प्रशांत बंधूंच्या कृपेने एक नाटक पाहिलं "जस्ट हलकं फुलकं" निर्माती श्रीमती कविता मच्छिंद्र कांबळी यांच्या भद्रकाली प्रोडक्शन तर्फे ऋषिकेश परांजपे लिखीत, गणेश पंडित दिग्दर्शित हे नाटक त्यात सागर कारंडे आणि भारत गणेशपुरे या अप्रतिम जोडीचा अप्रतिम अभिनय आणि त्याला अनिता दाते यांची अवखळ साथ…. नाटकाची सुरुवात झाली तेव्हा अंदाज आलाच होता कि नाटक जातिव्यवस्थेवर टीका करणार आहे. ("जातीव्यवस्थेवर" हा !! "जातीवर" नाही !!.). डॉक्टर चा प्रसंग पाहून नाटक थोड वेगळ वळण घेतय कि काय असं वाटू लागल. पण नंतर मात्र नाटकाने जी काही पकड घेतली ती शेवटपर्यंत सोडली नाही. तिन्ही कलाकारांनी वेगवेगळ्या व्यक्तिरेखांना पुरेपूर न्याय देत अगदी हसत हसत नाटकाचा अर्थ प्रेक्षकांपर्यंत पुरेपूर पोहोचवला. तिन्ही कलाकारांसोबत एका पडद्यामागच्या कलाकाराचे कौतुक करावेसे वाटते ते म्हणजे वेशभूषाकार अगदी क्षणात जादूची कांडी फिरवावी तसे हे कलाकार आपला वेश बदलत होते. सागर कारंडे आणि भारत गणेशपुरे यांनी तर फु बाई फ

खचून जाऊ नका - Be Brave

Image
तुम्हाला सतत "संकटांना" सामोर जाव लागतंय…. खचून जाऊ नका !!! लक्षात ठेवा….  "हुशार विद्यार्थीच"  नेहमी परीक्षा देत असतो  दुर्गवीर  चा  धीरु माझे अंतरंग http://dhiruloke.blogspot.in/

चांगल कोण?

Image
चांगल्याशी "चांगल" वाईटाशी "वाईट"  वागायचं म्हटलं तर….  "चांगल कोण?" हा विचार करावा लागतो… दुर्गवीर  चा  धीरु माझे अंतरंग http://dhiruloke.blogspot.in/

होय मी त्याच "दुर्गवीर" चा "शिलेदार"

Image
होय मी त्याच "दुर्गवीर" चा "शिलेदार"   जिथे "शिवप्रेम" "मनात" नाही, "रक्तात" भिनवल जात....  . जिथे "संकटाला" "पाठीवर" नाही, "छाताडावर" झेललं जात.... जिथे "गडांना" वास्तूपेक्षा,  "मंदिर" मानलं जात.... जिथे "संस्कृतीला",  "विकृतीपासून" जपल जात..... जिथे "मनगटांना",  "अजस्त्र काताळांशी" भिडवल जात..... जिथे "बाहुंना" "शिवप्रेमाच", "बळ" दिल जात.... जिथे हातांना "बडवीण्यापेक्षा",  "घडविण्यासाठी" राबवील जात..... जिथे फक्त "मनात" "संस्कार" नाही, "संस्कारात" "मन रमविल" जात....    होय मी त्याच "दुर्गवीर" चा "शिलेदार" दुर्गवीर  चा  धीरु माझे अंतरंग http://dhiruloke.blogspot.in/

विश्वास..

Image
पक्ष्याचा पंखावर असतो तो मोराचा काळ्या ढगांवर असतो तो                 वि झाडांचा मुळांवर असतो तो तान्ह्या बाळाचा आईवर असतो तो             श्वा लंगड्याचा त्याच्या काठीवर असतो तो डोळ्यांचा पापणीवर असतो तो                     स भक्ताचा देवावर असतो तो कर्तृत्ववानाचा त्याच्या क्षमतेवर असतो तो    दुर्गवीर  चा  धीरु माझे अंतरंग http://dhiruloke.blogspot.in/

सरकारला गणेशोत्सवाची गरज नाही - आयुक्त बिपीन मलीक

Image
सरकारला गणेशोत्सवाची गरज नाही - आयुक्त बिपीन मलीक महाराष्ट्र सदनात या वर्षी गणेशोत्सव साजरा केला जाणार नाही असा फतवाच जाहीर केलाय महाराष्ट्र सदनाचे निवासी आयुक्त बिपीन मलीक या महान व्यक्तीमत्वाने. हे तेच आहेत जे काही दिवसांपूर्वी चपाती प्रकरणात गाजत होते. अगोदर निकृष्ट जेवण देण्याचा आरोप त्यात पुन्हा हे धार्मिक भावना दुखावण्याचे प्रकरण. काय तर म्हणे गणेशोत्सवासारख्या कार्यक्रमावर खर्च करण्याची सरकारची अजिबात इच्छा नाही आहे. हे निवासी आयुक्त इतक बरळेपर्यंत महाराष्ट्र सदनातील सांस्कृतीक विभाग मूग गिळून गप्प का बसले आहे. या मलिक महाशयांनी गेल्या वर्षी पण गणेश उत्सवास विरोध केला होता परंतु कनिष्ट अधिकारी नंदिनी आव्हाडे यांनी कडाडून विरोध करून नाकावर टिच्चून गणेशोत्सव साजरा केला. अशी महाराष्ट्रद्वेशी / हिंदू द्वेशी भूमीका मांडताना लाज का वाटत नाही या महाराष्ट्र सरकारला आणि त्यांच्या चमच्यांना. जर महाराष्ट्र सरकारला जमत नसेल तर महाराष्ट्राच्या जनतेच्या हातात द्या आम्ही धुमधड्याक्यात साजरा करू आमचा गणेशोत्सव तुम्ही फक्त इफ्तार पार्ट्या साजऱ्या करा. तसेही आणि काही दिवसातच या

"गड-किल्ले" आणि "दुर्गवीर"

Image
मला एका व्यक्तीने विचारलं काय रे तू सतत… "गड-किल्ले" आणि "दुर्गवीर"  चा विचार करत असतोस… मी त्याला म्हटलं… तू कसा तुझ्या "घर" आणि "कुटुंब"  यांचा विचार करतोस तसा मी माझ्या…  "घर"(गड-किल्ले) आणू "कुटुंब" (दुर्गवीर)  यांचा विचार करत असतो…   दुर्गवीर  चा  धीरु माझे अंतरंग http://dhiruloke.blogspot.in/

विरोधक = मरणारा मासा

Image
तुमचे  "विरोधक" तुम्हाला  "त्रास"  देण्यासाठी  "धडपडतायत" काळजी करू नका… "मरणारा मासा"  नेहमी जास्त धडपडतो….

बघा आपल्या(बेळगावातील) मराठी बांधवांचे हाल….

Image
बघा आपल्या(बेळगावातील) मराठी बांधवांचे हाल…. सोबतचे छायचित्र पाहून अस वाटेल कि एखाद्या कैद्याला थर्ड डिग्री दिलीय पण तसं नाहीय हे छायचित्र आपल्या ( आपल्याच ) बेळगावातील मराठी बांधवाच आहे… काल कर्नाटक पोलिसांनी "येळ्ळुर" गावातील निशस्त्र मराठी बांधवाना मारहाण केली. कारण फक्त इतकच कि या गावक-यांनी एक बोर्ड लावला त्यावर लिहील होत "महाराष्ट्र राज्य येळ्ळुर".   बेळगाव सीमा वाद गेली ५० वर्षाहून अधिक काळ धुमसतोय पण "तोडगा" मात्र शुन्य…. बेळगाव मधील कित्येक पिढ्या मी मराठी असल्याचे ठासून सांगतायत पण त्याबदल्यात त्यांना काय मिळतंय महाराष्ट्र सरकारची परकेपणाची वागणूक आणि कर्नाटक सरकारच्या लाठ्या…. तिथले आपले मराठी बांधव मराठी साठी भगव्या च्या रक्षणासाठी अक्षरश: हौताम्य पत्करत आहेत. देशातील असे एकमेव राज्य आहे जिथे सरकारी इमारतीवर तिरंग्या सोबत भगवा अभिमानाने फडकवला जातो. २००५ साली साली बेळगाव महाराष्ट्रात यावे असा ठराव करण्यात आली त्याचा राग म्हणून कर्नाटक सरकारने महापालिकाच बरखास्त केली. बघा हे आपल्या मराठी बांधवांची हि अवस्था पाहून स्वताचीच आणि आपल्या

आयुष्य...

Image
"तांदळातील" आणि "आयुष्यातील"  "खडे" बाजूला करताना "किती"  कमी होतात  याचा विचार करू नका "जे"  शिल्लक राहतात  त्यांना सांभाळा…… दुर्गवीर  चा  धीरु माझे अंतरंग http://dhiruloke.blogspot.in/

संताप………….

Image
संताप…………. आजवर दुर्गवीर सोबतच्या प्रत्येक मोहिमेत चांगलेच अनुभव आले. प्रत्येक गडदर्शन मोहिमेनंतर मन बहरून जायचं… निसर्गाचा आणि त्या काळातील आपल्या राजांच्या बौद्धिक क्षमतेचा हेवा वाटायचा. पण आजची विसापूर आणि लोहगड ची मोहीम अक्षरशा संताप देऊन गेली.…. एक वेळ अस वाटल बस झाल ते करिअर आणि कुटुंबाची काळजी करणं… सोडून सगळ सरळ तलवार हातात घ्यावी आणि एकेकाला कापून काढावा…… आम्ही दुर्गवीर सकाळची इंद्रायणी एक्स्प्रेस पकडून लोणावळा व तिथून मरोळ येथे पोचलो तिथून चालत विसापूर च्या पायथ्याशी पोचलो तेव्हा लोहगड च्या दिशेने जाणा-या गाड्या दिसल्या पण त्यात दारूच्या बाटल्या घेऊन जाणारी टवाळ मुल (मुल कसली कार्टी) दिसली. डोक्यात संतापाची ठिणगी पडली. गावक-याना या बाबतीत विचारल तर "आम्ही काय करणार??" "आम्ही विचारल तर दम-दाटी करतात??" अशी मुळमुळीत उत्तर मिळाली. तो राग तसाच डोक्यात ठेवून आम्ही विसापूर ची चढाई सुरु केली. काही ओळखीचे दुर्गप्रेमी भेटले त्यांची भेट घेऊन गडाच्या माथ्यावर पोचलो तर तिथे पण हेच. कुठे जोडप आडोश्याला बसलय तर कुठे मुल-मुलि त्यात विवाहित जोडपी हि सामील होती.

"स्वार्थ" आणि "परमार्थ"

Image
"श्रेय" मिळण्यासाठी  "काम" करणे  म्हणजे "स्वार्थ" "कामाचे" "चीज"  होण्यासाठी "झटणे"  म्हणजे "परमार्थ" दुर्गवीर  चा  धीरु माझे अंतरंग http://dhiruloke.blogspot.in/

माझी एक शाळा होती……

Image
माझी एक शाळा होती…… जीच्या विषयी मनात हूरहूर होती, जिथे गुरु शिष्याची अतूट नाती होती, फटकळ असूनही आपुलकीची होती म्हणून अजोडपणाच्या गाठीत होती - १ माझी एक शाळा होती…… जिथे सकाळी दोघांची हातघाई होती तिथे दुपारला दिलजमाई होती मैत्री अतूट रहावी म्हणून मैत्रीत एक नरमाई होती - २ माझी एक शाळा होती…… जिथे बाईंच्या ओरडण्यावर, गप्प बसण्याची शिष्टाई होती जिथे गुरुजींच्या डोळे वटारण्यावर, मान झुकाविण्याची नरमाई होती - ३ माझी एक शाळा होती…… जिथे परीक्षा आली तोंडावर, कि अभ्यासाची घाई होती. अखेरच्या मिनटात अभ्यास उरकून, पास होण्याची कलाई होती. - ४ माझी एक शाळा होती…… जरी दूर असली घरापासून, मनाच्या गाभा-यातील होती संस्काराच्या कठोर घावांनी मूर्ती घडविण्याची "ती"ची किर्ती होती - ५ माझी एक शाळा होती…… हरवलीय ती आज कुठेतरी शोधून देईल का कुणीतरी पैश्याच्या या नादापायी, गमावून बसलोय तिला खरोखरी    - ६ माझी एक शाळा होती…… माझी एक शाळा होती…… दुर्गवीर  चा  धीरु माझे अंतरंग http://dhiruloke.blogspot.in/ First Published in Uddan Annual Magazine of

"हिरा"

Image
"मी" एकटा आहे…………. कारण "हिरा" तोवर एकटा असतो जोवर त्याला साजेशी "अंगठी" मिळत नाही दुर्गवीर  चा  धीरु माझे अंतरंग http://dhiruloke.blogspot.in/