Posts

Showing posts from March, 2014

इन्कलाब जिंदाबाद!!

Image
इन्कलाब जिंदाबाद!! चा नारा देत आणि शेवटच्या श्वासापर्यंत भारतमातेशी एकनिष्ठ राहणा-या भगतसिंग,  सुखदेव,  राजगुरु या तीन वीरांना शतश: नमन…… दुर्गवीर  चा  धीरु माझे अंतरंग http://dhiruloke.blogspot.in/

होळी (Holi)

Image
होळी (Holi) होळी वसंत ऋतूच्या आगमनाच्या निमित्ताने होळी हा सण साजरा केला जातो. होळीचे पौराणिक महत्व:- भक्त प्रल्हादांना संपविण्यासाठी हिरण्यकश्यपुने धाडलेल्या होलिकाचा श्री विष्णूंनी वध केला. त्याचे प्रतिक म्हणून होळी पेटविण्यात येते. होळीचे वैचारिक महत्व :- मनातील वाईट विचारांना आगीत जाळून संपविणे ह्याचे प्रतिक म्हणजे होळी होय. वैज्ञानिक महत्व :- या काळात झाडांची मोठ्या प्रमाणावर गळतात तीच गोळा करून त्याचे आगीत दहन केले जाते. यात कुठेही वृक्षतोड होत नाही. दुस-या दिवशी ह्याच आगीची राख थंड झाल्यावर अंगाला लावली जाते ते पुढे येणा-या उष्ण वातावरण सहन करता येईल याचे ते एक प्रतिक आहे. आजच्या काळात मात्र या सर्व संज्ञा मागे पडत आहेत वृक्षांची कत्तल होत आहे. आणि यात काही हिंदूधर्म द्वेषी होळी सण साजरा करू नका म्हणून सल्ले देत आहेत. वृक्ष तोड न करता आपल्या परिसरातील, झाडांची पाने (झाडे शिल्लक असतील तर), सुका कचरा, अश्या अनेक वस्तू ज्याचा कचरा होतो त्याची होळी करा. आपल्या पूर्वजांनी प्रत्येक सण साजरा करताना वैज्ञानिक दृष्टीकोन लक्षात घेतला आपणही याकडे डोळसपणे पाहायला हवे. विरोधाला

अनपेक्षित, अवाढव्य, उदंड आणि अविस्मरणीय

Image
अनपेक्षित, अवाढव्य, उदंड आणि अविस्मरणीय माझ्या आजवरच्या २६ वर्षाच्या आयुष्यात जितक मला आठवतं त्यावरून यावेळचा वाढदिवस ख-या अर्थाने अनपेक्षित, अवाढव्य, उदंड आणि अविस्मरणीय होता. > सकाळी कामावर "अनपेक्षितपणे" मिळालेले गिफ्ट. > दुर्गवीरांच्या भेटीवेळी "एका दुर्गवीर बंधुंकडून" मिळालेलं "अवाढव्य"(किंमतीने) गिफ्ट. > फेसबुक,फोन, मेसेज, Whats App वर मिळालेल्या "उदंड" शुभेच्छा. > आणि भाऊ, बहिण आणि भावोजी यांनी दिलेली शिवरायंची मूर्ती हे "अविस्मरणीय" गिफ्ट माझ्यावर प्रेम करणा-या ज्ञात - अज्ञातांचे खूप खूप धन्यवाद……. दुर्गवीर  चा  धीरु माझे अंतरंग http://dhiruloke.blogspot.in/

स्त्री सन्मान…

Image
स्त्री सन्मान… "स्त्री" एक दैवी चमत्कार…… निर्माणकर्त्याने संपूर्ण विश्वाची निर्मिती करताना एक माधुर्यपूर्ण "रसायनाची" निर्मिती केली जिच्या शिवाय हे विश्व अपूर्ण राहिले असते ती म्हणजे "स्त्री"… खर तर एक स्त्री नेहमीच वेगवेगळ्या भूमिकेत आपल्या जबाबद-या पार पाडत असते. कधी मुलगी तर कधी बहिण, कधी पत्नी तर कधी आई प्रत्येक वेळी ती तीच्या स्त्रीत्वाची जबाबदारी योग्य रीतीने पार पाडते असते. आज स्त्री कुठल्याच क्षेत्रात मागे नाही हे नव्याने सांगायला नको. आज "जागतिक महिला दिनाच्या" निमित्ताने त्याच स्त्रीच्या सन्मानाची गरज आहे. आज डेलीसोप, चित्रपटां मध्ये अतिरंजितपणे रंगविली जाणारी स्त्री ख-या आयुष्यात तशी नसते हे सामान्य माणसाला त्याच्या आई-बहिणीकडे पाहिल्यावर जाणवते. आज देशात स्त्री कितपत सुरक्षित आहे हे आपण जाणतोच आजची स्त्री आरक्षण नाही तर संरक्षण मागतेय. पण इतिहास साक्षीदार आहे जेव्हा संकट येते तेव्हा सोज्वळ अशी स्त्री रौद्र अवतार घेऊ शकते. जी स्त्री लक्ष्मी, सरस्वती ह्या सोज्वळ रुपात पाहतो तिचे महिषासूरमर्दिनीचे रूपही प्रत्येकाला परिचि